Thursday, December 16, 2010

तिन्ही सांजा

सूर्यास्ताच्या वेळी,
दिवसाच्या या तिन्ही सांजांबरोबर,
माझ्याही आयुष्याच्या,
तिन्ही सांजा,
 सूर्योदयापासून विचार करतो, 
आयुष्यभर काय केले,
बालपणी खेळलो, बागडलो,
समजही नव्हती,
तारुण्यात,
तारुण्यात, स्वत:च्याच मस्तीत,
कुणाला न जुमानता,
आणि आता वार्धक्यात,
तारुण्यातील व्यसनांनी जर्जर झालेले शरीर,
जीवनात काय मिळवले,
मुला-नातवंडांकडून तिरस्कार,
शिथील गात्रे,
आता रात्र होण्याची वाट पाहत आहे,
बुडवून टाकावे काळरात्रीच्या  अंधारात !
जेथे स्वत:चाही चेहरा स्वत:पासून लपविता येतो,
त्या मृत्यूचे स्वरूप पहायचे आहे,
आनंदाने ! दु:खानेही !!

                                                                                                                                                 -गोपाल



Monday, December 6, 2010

प्यार की झप्पी

मंडळी,
संजय दत्तची प्यार की झप्पी सगळयांनाच ठाऊक असेल. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगाराला दिलेली प्यार की झप्पी सगळ्यांनाच आठवते.
रोजचे काम करणारे व्यक्ती नक्कीच अशा कृतीने मोहरून जातात. अगदी रोजच्या भांडेवालीला एखाद्या दिवशी आज भांडे स्वच्छ घासलेस असे म्हणा बरे.
ईस्त्रीवाल्या धोब्याला किती कडक ईस्त्री केलीस म्हणून सांगा. तुमच्या कपड्यांची खरच कडक ईस्त्री तो करून देईल. ऑफिसात सफाई करणारया शिपायाला टेबल किती स्वच्छ पुसलास म्हणून
त्याच्या कामाची पावती द्या बरे. तो नक्कीच तुम्हाला त्या दिवशी परत दिसला की  नमस्कार घालेल. रोज तुमचे टेबल इतरांपेक्षा स्वच्छ पुसेल.
तुमच्या हाताखालच्या माणसांचे असे छोटे छोटे कौतुक केले तर तुम्ही नक्कीच लोकप्रिय Boss
व्हाल. तुमच्या प्रोजेक्टचे टार्गेट तुम्ही गाठू शकाल. तुमच्या अडचणींच्या वेळी तुम्हाला मदत मिळेल.
हॉटेलात जेवल्यानंतर एखादा पदार्थ आवडल्याची पावती मालकाला दिली तर ती बिलापेक्षाही मोठी असेल.
अहो, स्तुती कोणाला प्रिय नाही. प्रत्यक्ष देवसुद्धा स्तुतीनेच प्रसन्न होतो. साधू, संत, ऋषी, मुनी हे सुद्धा स्तुतीप्रियच आहेत. तुम्ही आम्ही तर सामान्य माणसेच. Appreciation हे रोजच्या व्यवस्थापनात दाखवले, तर यशाची पायरी गाठता येईल.
तर मंडळी, तुम्हाला काय वाटते ?
तुम्ही असे कधी केले आहे का ?

Thursday, December 2, 2010

आपले शेजारी

आपल्या शेजाऱ्यांची व्याख्या आपण कशी एकदम बंदिस्त केलेली आहे असे वाटत नाही का ? आपल्या घराशेजारी राहणारे ते आपले शेजारी . फक्त घराशेजारी राहणारे तेच शेजारी का ? out of box विचार केला तर वेगवेगळे शेजारी असू शकतात.
आपल्या टेलीफोन नम्बरचा शेजारी कोण आहे याचा आपण विचार केला आहे का ? सहज प्रयत्न तर करा ? आपल्या टेलीफोन नम्बराच्या आगे मागे असणारया नम्बरांना  जरा सहज फोन करून बघा. कदाचित आश्चर्याचा धक्का  बसेल.
आपल्या मोबाईल नम्बराच्याही मागील पुढील नम्बराना संपर्क करा.
काय मंडळी, कशी काय वाटली कल्पना ?
आपल्या गाडीच्या नम्बरच्या मागचा पुढचा नंबर असणारी गाडी दिसते का ? बघा. त्याला थांबवून आपण दोघे गाडी नंबरचे शेजारी आहोत हे त्याला सांगितले तर तो नक्कीच चहा पाजेल.
परीक्षेच्या वेळी शेजारील नम्बरांशी मैत्री केली तर काय फायदे होतात हे मी सांगायला नको ?
तर मंडळी, आपण असे कधी try केले आहे का ?
तुम्हाला काय  वाटते ?