आपल्या शेजाऱ्यांची व्याख्या आपण कशी एकदम बंदिस्त केलेली आहे असे वाटत नाही का ? आपल्या घराशेजारी राहणारे ते आपले शेजारी . फक्त घराशेजारी राहणारे तेच शेजारी का ? out of box विचार केला तर वेगवेगळे शेजारी असू शकतात.
आपल्या टेलीफोन नम्बरचा शेजारी कोण आहे याचा आपण विचार केला आहे का ? सहज प्रयत्न तर करा ? आपल्या टेलीफोन नम्बराच्या आगे मागे असणारया नम्बरांना जरा सहज फोन करून बघा. कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल.
आपल्या मोबाईल नम्बराच्याही मागील पुढील नम्बराना संपर्क करा.
काय मंडळी, कशी काय वाटली कल्पना ?
आपल्या गाडीच्या नम्बरच्या मागचा पुढचा नंबर असणारी गाडी दिसते का ? बघा. त्याला थांबवून आपण दोघे गाडी नंबरचे शेजारी आहोत हे त्याला सांगितले तर तो नक्कीच चहा पाजेल.
परीक्षेच्या वेळी शेजारील नम्बरांशी मैत्री केली तर काय फायदे होतात हे मी सांगायला नको ?
तर मंडळी, आपण असे कधी try केले आहे का ?
तुम्हाला काय वाटते ?
No comments:
Post a Comment