सूर्यास्ताच्या वेळी,
दिवसाच्या या तिन्ही सांजांबरोबर,
माझ्याही आयुष्याच्या,
तिन्ही सांजा,
सूर्योदयापासून विचार करतो,
आयुष्यभर काय केले,
बालपणी खेळलो, बागडलो,
समजही नव्हती,
तारुण्यात,
तारुण्यात, स्वत:च्याच मस्तीत,
कुणाला न जुमानता,
आणि आता वार्धक्यात,
तारुण्यातील व्यसनांनी जर्जर झालेले शरीर,
जीवनात काय मिळवले,
मुला-नातवंडांकडून तिरस्कार,
शिथील गात्रे,
आता रात्र होण्याची वाट पाहत आहे,
बुडवून टाकावे काळरात्रीच्या अंधारात !
जेथे स्वत:चाही चेहरा स्वत:पासून लपविता येतो,
त्या मृत्यूचे स्वरूप पहायचे आहे,
आनंदाने ! दु:खानेही !!
-गोपाल
No comments:
Post a Comment